जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षातर्फे वीर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. शहरात त्यानिमित्ताने ६ एप्रिल रोजी रॅली काढण्यात येणार आहे. तसेच, जळगावात १० एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप वर्धापनदिनानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांनी दिली.
पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा संघटक सचिन पानपाटील, मनपा गटनेते राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, आदी उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शाखा उदघाटन, कार्यकर्ता संवाद होणार आहे. यावेळी आ. राजूमामा यांनी सांगितले कि, वीर सावरकर यांचा वारंवार होणार अपमान थांबण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.