जिल्हा प्रशासनाकडून संपादक भगवान सोनार यांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी) : मतदान करण्यासाठी जनतेत प्रभावी जनजागृती केल्याबद्दल “केसरीराज” चा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपादक भगवान सोनार यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी दि. १३ मे रोजी मतदान घेण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत होती. त्यासह माध्यमांमधूनही जनजागृती करण्यात येत होती. “केसरीराज” च्या माध्यमातून देखील नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत होते. यामुळे मतदान करण्याची टक्केवारीमध्ये यंदा वाढ झाली आहे.
यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे माध्यमातून जनजागृती करणाऱ्या संपादकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये “केसरीराज”चे संपादक भगवान सुपडू सोनार यांचा प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी भागवत, समाज कल्याण विभागाचे आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.