नशिराबाद पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हे दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- मालकाच्या मृत्यूनंतर भाडेतत्त्वावर दिलेल्या बँडचे तब्बल ७ लाख ७५ हजार रुपये भाडे दिले नाही म्हणून पाच जणांविरूद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील रायपूर – कंडारी येथील किरण संपत यांचा विवाह सोहळा व इतर शुभ कार्यामध्ये बँड वाजविण्याचा व्यवसाय होता. त्यांचे निधन झाल्यानंतर सदर बँड साहित्य रायपूर येथेच भाडेतत्त्वावर देण्यात आले. मात्र, जून २०२०पासून या बँड साहित्याचे भाडे मिळत नसल्याने किरण यांच्या कुटुंबीयांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. भाड्याची ही रक्कम ७ लाख ७५ हजार रुपयांवर पोहचली. तरीदेखील ती मिळत नसल्याने मयताचे नातेवाइक रवींद्र दगडू धनगर (३२) यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजू शेख बाबू पटेल (५२), जाकीर शेख युनूस (३४), आरिफ शेख युनूस शेख (३२), भैया बाबू पटेल (३५), ताहीर राजू पटेल (१९, सर्व रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे करीत आहेत.