नागपूर ( वृत्तसंस्था ) – दारुड्यांशी झालेल्या वादातून गुंडाची हत्या झाल्याची घटना नागपूरात घडली फ्रँक भूषण अँथोनी असे मयत गुंडाचे नाव आहे.

गुंड फ्रँक अँथोनी हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगर भागात राहतो. रात्री तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी खोब्रागडे चौकात पाच दारुड्यांमध्ये वाद सुरू होता. फ्रँक तिथे उभा राहून वाद बघत असताना भांडण करत असलेल्या एकाने त्याला काय बघतोय बे…. असं म्हटल्यानंतर फ्रँक अण्णा चिडला. त्यानंतर फ्रँक अण्णा आणि त्या पाच आरोपींमध्ये वाद सुरू झाला असता त्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या शस्त्राने फ्रँक अण्णाला जखमी केले. यावर समाधान न झाल्याने आरोपींनी त्याची दगडाने ठेचून हत्या हत्या केली. यावेळी पाचही आरोपी दारूच्या नशेत होते. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत फ्रँक अण्णाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, धारदार शस्त्र आणि कट्टे (बंदूक) बाळगणाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.







