रेल्वे प्रशासनाची माहिती
भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली-जळगाव दरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. हे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० मन्यारखेडा रोड आणि लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक १५० खांब ४२४/२१ ते २३ हे दि.२३ जुलै ते दि. २२ ऑगस्ट दरम्यान बंद राहील. (केजीएन)सकाळी ६ वाजेपर्यंत रस्त्याचे काम आणि ड्रेनेज बांधकाम कामासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. एकूण ३१ दिवसांसाठी गेट बंद राहील, नागरिकांनी कृपया याची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.