जळगाव ;- महात्मा फुले कृषि विद्यापीठातंर्ग त संचलित डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय जळगाव येथील कृषि पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कृषिदूत हेमंत रवींद्र खडसे यांचे ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव आणि औद्योगिक संलग्नता 2021-22 च्या अभ्यास दौऱ्याचे नुकतेच भादली बु।। ता.जळगाव येथे आगमन झाले. कृषिदूत हेमंत खडसे यांनी शेतकऱ्यांना कोरोना महामारी चालू असल्यामुळे त्यांनी सुरक्षिकतेचे उपाय, कोव्हिड लसीकरण जनजागृती तसेच शेतावर जाऊन बीजप्रकिया माती परीक्षण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चार प्रकिया ,पाणी व्यवस्थापन ,फवारणी करताना घ्यावयची काळजी याबद्दल, रासायनिक खतातील भेसळ ओळखणे, स्वछ दूध उत्पादन, विविध फळझाडाच्या कलम तयार करणे याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भादली बु।। गावाचे सरपंच मिलिंद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य परेश रडे, छोटू पाटील, अरुण सपकाळे, पशुवैद्य डॉ. देवेंद्र चौधरी, युवा शेतकरी प्रतीक जंगले, उपस्थित होते. उपक्रमासाठी गोदावरी फाउंडेशनचे अधक्ष्य. डॉ. उल्हास पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे , उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे , कार्यक्रम समनव्यक प्रा. ए. डी. फाफळे , कर्यक्रम अधिकारी प्रा. बी. बी. मुंडे व तज्ञांचे मर्गदर्शन लाभत आहे.








