जळगाव ;- तालुक्यातील भादली बुद्रुक येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील जळगाव, येथील कृषि पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी कृषिदूत हेमंत रवींद्र खडसे यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे भादली बु।। ता.जळगांव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यामध्ये त्यांनी बियाण्याची उगवणक्षमता व उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया कशी करावी व का करावी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी कृषिदूतांनी बीजप्रक्रियेचे फायदे व महत्त्व शेतकऱ्यांना समजवून सांगितले.
तसेच त्यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांना कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेले विविध अँप्स प्रत्यक्ष प्रात्यक्षिक म्हणून शेतकऱ्यांना ते अँप आपल्या मोबाईल मध्ये कसे वापरावे याबाबत संपुर्ण माहिती देऊन त्यांचे विविध समस्या व प्रश्नांचे निरसन केले व शेतकर्यांना समाधानी केले. त्यासोबतच विविध फळझाडाचे कलम कसे तयार करावे व फळ झाड लावण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी व प्रतिष्टीत नागरिकांनी त्यांच कौतुक केले.
यासाठी त्याला डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य.शैलेश तायडे सर,उपप्राचार्य.पी.एस. देवरे ,कार्यक्रम समनव्यक प्रा.ए. डी. फाफळे ,कार्यक्रम अधिकारी बी.बी.मुंडे, तसेच विषयतज्ञ प्रा.अश्विनी मट्टे (plant pathology), प्रा. पी. वी. सावळे (Horticulture) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.