भडगाव तालुक्यात शोककळा
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाडे येथील एका जवानांचे सुटी पूर्ण करून ते कर्तव्यावर जात असताना मालपुर,आग्रा जवळ रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि. २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली आहे. यामुळे भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.
समाधान सखाराम महाजन (वय ४०, रा. वाडे ता. भडगाव) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांचे पश्चात आई, वडील, एक बहिण, पत्नी असा परीवार आहे. आर्मी मध्ये देशसेवेत नौकरीला होते. ते आरआरजेएनके पुंच्छ येथील पोस्टींगवर कार्यरत होते. (केसीएन)समाधान सखाराम महाजन याचें लग्न दीड वर्षापूर्वीच झाले आहे. ते एका महिन्यांची सुट्टीवर घरी आलेले होते. सुट्टी पूर्ण करून कर्तव्यावर हजर होणे कामी ते मंगळवारी दि. २३ रोजी निघालेले होते.
दरम्यान, परतीचा प्रवास करीत असताना मालपुर,आग्रा जवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली. घटनेबाबतची माहिती गाव परिसरात, तालुक्यात पोहोचताच संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. जवानाचे पार्थिव गावात आणले जाणार आहे.