भडगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात मानसिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण , भडगावचे पो. नि. अशोक उतेकर , न. प. मुख्याधिकारी रविंद्र लांडे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुरज पाटील यांची उपस्थिती होती.
तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी मानसिक आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण यांनी कोरोना महामारी, कौटुंबिक कलह, अतिवृष्टी, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे मानसिक आजार होत आहेत त्यावर उपचार गरजेचे आहेत मानसिक आजार इतर आजाराप्रमाणे बरा होऊ शकतो. वेळेत औशधोपचार व समुपदेशन हीच गुरुकिल्ली आहे , असे सांगितले . या शिबिरात 157 रुग्णाची तपासणी करण्यात आली 115 रुणांना उपचार देण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.साहेबराव अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी, डॉ.कांचन नारखेडे, मानसतज्ञ दौलत निमसे, सामाजिक .कार्यकर्त्या ज्योती पाटील, परिचारक विनोद गडकर, कार्यक्रम सहाय्यक मिलीद बरहाटे, चंद्रकांत ठाकूर, ग्रामीण रुग्णालय ( भडगाव ) येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन नारखेडे यांनी केले . सूत्रसंचालन दौलत निमसे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ.साहेबराव अहिरे यांनी मानले.