भडगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक लखिचंद पाटील व राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गट आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांना जोरदार धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
भाजपचे भडगाव पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली आज जामनेर येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ,जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लखिचंद पाटील व राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाने भडगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत या जाहीर प्रवेशामुळे दिल्याचे बोलले जात आहे. तसेच विद्यमान या. किशोर पाटील आणि माजी आ. दिलीप वाघ या दिग्गज नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे अशी चर्चा भडगाव पाचोरा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.