पारोळा तालुक्यातील भोंडण येथील घटनेने खळबळ
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यात भोंडण येथे नाशिक येथील तरुणी गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्त मामाकडे आली होती. तिने दि. २७ रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुलीचे मामा सतीश सुखदेव सोनवणे (रा. भोंडण) यांनीं पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांची भाची पायल संतोष शिंदे (वय १८,रा.पाथर्डी फाटा, नाशिक) ही मराठा कॉलेज, उत्तमनगर, नाशिक येथे इयत्ता १२ वी चे शिक्षण घेत होती.(केसीएन)ती गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या कालावधीत मामाकडे भोंडण येथे आली होती. दि.२७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरातील कुटुंबीय जेवण करुन झोपून गेले. तिचा मामा दि.२८ रोजी सकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास जागी झाला असता त्याची भाची हि छताच्या लोखंडी पाईपला खाटीच्या दोरीच्या साहय्याने गळफास घेतलेली दिसली.
लागलीच पायल हिस ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेने पुढील उपचाराकामी कुटीर रुग्णालय, पारोळा येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी पायल हिस तपासुन मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना जयंत सपकाळे हे करीत आहे.