राज्यभरातील तज्ज्ञ सर्जन्सची उपस्थिती, निवासी विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
जळगाव ( प्रतिनिधी ) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील शल्यचिकित्सा विभाग, अमासी संस्था, मुंबई आणि जळगाव सर्जिकल सोसायटीच्या सहकार्याने आयोजित ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सर्जरी वर्कशॉप’ नुकतेच उत्साहात, यशस्वीपणे पार पडले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला राज्यभरातील सहभागी शल्यचिकित्सकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत देशातील ख्यातनाम लॅप्रोस्कोपिक चिकित्सकांनी विविध आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांचे थेट प्रात्यक्षिक सादर केले. यात डॉ. समीर रेगे (केईएम, मुंबई), डॉ. संदीप सबनीस (नाशिक), डॉ. आदित्य भाटवाल (धुळे), डॉ. रोहन जैन (बडवानी) आणि डॉ. प्रखर गुप्ता (नाशिक) यांचा समावेश होता. या वर्कशॉपमध्ये विविध अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यात लॅप अपेंडेक्टॉमी, लॅप कोलेसिस्टेक्टॉमी, लॅप फंडोप्लिकेशन तसेच विविध हर्निया शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी
या प्रात्यक्षिकांमुळे सहभागी डॉक्टरांना लॅप्रोस्कोपीमधील मौल्यवान कौशल्ये आत्मसात करता आली. कार्यक्रमात “लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमीतील गुंतागुंत आणि त्यांचे व्यवस्थापन” या ज्वलंत विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. डॉ. समीर रेगे यांनी या चर्चेचे संयोजन केले. या पॅनेलमध्ये डॉ. किरण पाटील, डॉ. मारोती पोटे, डॉ. वासुदेव वारके, डॉ. योगेश चौधरी, डॉ. किरणकुमार मागर, डॉ. सचिन इंगळे आणि डॉ. रुचा जाजू नवल यांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांच्या अनुभवावर आधारित महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शल्यचिकित्सा विभागप्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. आयोजनात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, डॉ. रोहन पाटील, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. तुषार चौधरी, डॉ. हर्षा चौधरी, डॉ. भूषण महाजन, डॉ. कृतीका मकमले आणि निवासी डॉक्टरांनी मोलाचे योगदान दिले.
आयोजकांनी सांगितले की, तज्ज्ञ सर्जनांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सहभागी डॉक्टरांच्या प्रतिसादामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.









