जळगाव (प्रतिनिधी) – हरिविठ्ठलनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी जिल्हापेठ परिसरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची प्ररकणी जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुस-या दिवशी हि बालीका तालूका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री मिळून आली आहे.
हरिविठ्ठलनगरातील चौदा वर्षीय गायत्री शुक्रवारी दि.२३ रोजी दुपारी हॉस्पिटलच्या परिसरात आली होती. त्यानंतर पुन्हा घरी परतली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला,अखेर मुलीच्या आईने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरिक्षक प्रदीप चांदेलकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने रात्रभर या मुलीचा शोध घेतला. शनिवारी रात्री आठ वजता हि मुलगी तालूका पेालिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आली असून पोलिस कर्मचारी पेापट सोनार, महिला पोलिस जयश्री मालखेडे यांनी तिची चौकशी करुन विचापुस केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हिच बालीका असल्याची खात्री झाल्यावर तिला जिल्हापेठ पेालिसांना सोपवण्यात आली. पेालिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करुन तिच्या कुटूंबीयांना सापडल्याची माहिती देत आईच्या स्वाधीन करण्यात आले.