अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी ) बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील चौबारी गावातील एका विहिरीत १४ ऑगष्ट रोजी दुपारी चार वाजता आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रिनाबाई बिरबल पाडवी वय २४ रा. पानसेमल ता.बडवानी मध्यप्रदेश ह.मु.चौबारी ता.अमळनेर असे मयत झालेल्या तरूणीचे नाव आहे.
रिनाबाई पाडवी ही तरूणी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिनाबाई पडवी हीने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती आढळून न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली होती .
बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता गावातील राहत असलेल्या परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.