जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधि) : तालुक्यातील शिरसोली येथील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील सेंट्रींग काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी ही २४ जुलै रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान बेपत्ता झाली.
या प्रकरणी मुलीच्या पित्याने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.