जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील विवाहितेसह खेडी येथील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
तालुक्यातील शिरसोली येथील २८ वर्षीय विवाहिता ही १२ जुन रोजी राहत्या घरून सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोणास काही एक न सांगता बेपत्ता झाली आहे. तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच खेडी गावातील १८ वर्षे तरुणी ही देखील राहत्या घरून निघून गेली आहे. तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी दोघांचा शोध घेत आहेत.