जळगाव ( प्रतिनिधी ) – बेकायदा गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे .
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक जळगावातून भुसावळला पाठवण्यात आले होते . या पथकाने भुसावळ शहरातील चितोडे वाणी मंगल कार्यालयाच्या परिसरातील मोकळ्या जागेत बेकायदा गावठी पिस्तूल बाळगून फिरत असलेला आरोपी खुशाल बोरसे ( रा – खडका रोड , रामदासवाडी , भुसावळ ) याला पिस्तुलासह १६ नोव्हेम्बररोजी ताब्यात घेतले . त्याच्याविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
स पो नि जालिंदर पळे , स फौ अशोक महाजन , पो हे कॉ लक्ष्मण पाटील , संदीप साबळे , पो ना किशोर राठोड , रणजित जाधव , श्रीकृष्ण देशमुख , पो कॉ विनोद पाटील , ईश्वर पाटील , विजय चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.