मुंबई वृत्तसंस्था ;- बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन देशातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सोनी टीव्हीने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की, ‘अमिताभ बच्चन प्रेक्षकांना सांगत आहेत की तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये किती अंतर आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त तीन अक्षरे, प्रयत्न करा. तर, आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी फोन उचलून तयार व्हा, कारण केबीसी 13ची नोंदणी 10 मे पासून सुरू होत आहे

केबीसी 12च्या यशानंतर ‘कौन बनेगा करोडपती’ शानदार सीझन सोनी टीव्हीवर लवकरच परत येणार आहे. केबीसी नेहमीच जुलै महिन्यामध्ये प्रसारित होत असतो, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे शोचा मागील हंगाम जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात अगदी उशीराच सुरू झाला होता. या कार्यक्रमाच्या 13व्या पर्वाबद्दल बोलायचे, तर हे पर्व देखील ऑगस्टच्या आसपास सुरू होऊ शकते. सध्या सर्व मोठे रिअॅलिटी शोज मुंबईत शुटिंग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.







