धानो-यात रुग्णांना फळ वाटप.कोरोना योद्धांचा सत्कार.

धानोरा (प्रतिनिधी) – गेल्या आठ महीन्यांपासुन स्वतः चा जीव धोक्यात घालुन आरोग्यसेवेचा व्रत अविरत सुरु आहे.आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.आरोग्यसेवा करतांना कोरोना बाबत सातपुडा पर्वतातील वाडे-वस्त्यांवर जनजागृती केली.आमच्या आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत नाही आहे.आलेल्या प्रत्येक रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन दिला जात आहे.कोरोना चाचणी करतांना व झाल्यावर समुपदेशन करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे,कधीही भरुन निघणारे हे आमचे काम अविरत सुरुच राहणार असल्याचे मत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश कवडीवाले यांनी व्यक्त केले.

येथिल हेल्प फॉर यु या फाउंडेशन च्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच गेल्या आठ महीन्यांपासुन निस्वार्थ भावनेने काम करणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी फाउंडेशन च्या वतीने गौरव कलाण्यात आला.यामुळे त्यांचे आत्मबल नक्की उंचावेल.यावेळी डॉ बी आर आंबेडकर अभ्यासिकाचे संचालक प्रशांत सोनवणे,फाउंडेशन चे अध्यक्ष अब्दुल कादीर,वाहीद शेख,जावेद खान,सामाजिक कार्यकर्ते शंकर साळुंखे,प्रविण ठाकुर,सर्व आरोग्य सेवक,सेविका,आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन फारुख शाह,आभार अब्दुल कादीर यांनी केले.
न भरुन निघणारे योगदान
गेल्या आठ ते नऊ महीन्यांपासुन सतत आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा करत आहेत.आपल्या परीवाराला लांब ठेवत आपले कार्य पार पाडत आहेत.गेल्या शंभर वर्षात अशी भयावह परीस्थिती कधी आली नाही असे आपले आजोबा सांगतात.आता आम्ही येणा-या पिढीला सांगु की,कोरोना सारखा गंभीर व्हायरस हा आपल्या देशात,जगात येऊन गेला.यामुळे प्रचंड प्रमाणात सर्व स्तरावर आर्थिक नुकसान झाले असे मार्गदर्शन फारुख शाह यांनी केले.







