चुंचाळे ता.यावल जगात व जळगाव जिल्ह्यात थैमान घातलेला कोरोना व्हाषयरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चुंचाळे येथील सुनिल नेवे एकता फाऊंडेशन तर्फे चुंचाळ्यात व बोराळ्यात सँनिटायझर व टि.सी.एल पावडरची फवारणी करण्यात आली . याबाबत सुनिल नेवे एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष यावल देखरेख संघाचे सचालक सुनिल नेवे यांच्या अध्यक्षतेखाली समर्थ सुकनाथ बाबा दरबार पासून फवारणीला सुरवात करण्यात आली . यावेळी स्वच्छतेचे धडे देण्यात आले पूर्ण गावात साफसफाई ठेवावी व सर्व नागरिकांनी दिवसातून दर दोन तासानंतर हात साबणाने किंवा सँनिटायजर ने स्वच्छ धुवावे व कोणीही घराच्या बाहेर निघू नये कोरोना व्हायरसला गावात येऊ न देता आरोग्याची काळजी घ्यावी असे सुनिल नेवे एकता फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यानी सांगितले तसेच कोरोना विषाणुमुळे गावात आजार पसरु नये व नागरिकांची गर्दी एका ठिकाणी एकत्र येऊ नये असे सुनिल नेवे यांनी आवाहन केले तसेच सौखेडासिम येथील पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी फवारणी यंत्र निशुल्क उपलब्ध करुण दिले यावेळी श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन चे देवचंद कोळी,चंद्रकांत चौधरी, धनसिंग राजपूत,माजी ग्रा.प.सदस्य विठ्ठल राजपूत,गोकुळ कोळी, ज्ञानेश्वर कोळी,पप्पु पाटील प्रकाश चौधरी,प्रमोद चौधरी,दिपक कोळी,सुधाकर कोळी,दिपक नेवे,गोकुळ उत्तम पाटील,आबा राजपूत,सुधिर कोळी,पवन राजपूत,हेंमत राजपूत,बंटी नेवे,धिरज नेवे,डिगबंर साळुखे,शुभम राजपूत,भुषन राजपूत ,बोराळे येथील प्रदिप वानखेडे,विक्की वानखेडे,अमर वानखेडे आदी उपस्थित होते.