जळगाव ;- अमळनेर शहरातील खलेश्वर कांजरवाड्यात पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकायला गेले अन त्यांच्या हाती लागले ४९ लाख रुपयांचे घबाड मिळाल्याची घटना आज दुपारी येथे घडली असून लॉकडाऊन असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आली कशी ? असा प्रश्न अमळनेरकरांना पडला आहे .
बादरपुर रोड येथील कंजर वाड्यातील अवैद्य धंदे विरुद्ध कारवाई साठी गेले असता या ठिकाणी४० हजारांचा २ किलो गांजा , २५ हजारांच्या गावठी दारूचे 1500 लिटर कच्चे रसायन, ३ हजारांची गावठी दारू , ९०० रुपयांची तलवार आणि
रोख रक्कम ४८ लाख४१ हजार ६८०असे एकूण ४९ लाख १० हजार ५८० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .
यांनी केली कारवाई
कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाने, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, पंचायत समितीचे बीडीओ संदीप वायाळ, पोलीस हवालदार दिपक विसावे, भटूसिंह तोमर, शरद पाटील, दिपक माळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील, हितेश चिंचोरे, राहुल चव्हाण, विलास बागुल, विनोद धनगर, व किरण धनगर (महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग) महिला पोलीस रेखा ईशी, आम्रपाली पालवे, शामल पारधी आणि
पंच म्हणून भूपेंद्र बाविस्कर व जितेंद्र पवार यांनी हि कारवाई केली