जळगाव ;- येथील चेट्टीनाड सिमेंटतर्फे जळगावात गरजुंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी गरजू व्यक्तींनी समाधान व्यक्त केले . किराणा साहित्याचे वाटप चेट्टीनाड सिमेंटचे असिस्टंट व्हाइस प्रसिडेंट नागेंद्र कुमार ,असिस्टंट जनरल मॅनेजर रुद्र देव प्रसाद , डेप्युटी मॅनेजर नागेंद्र सिंह यांच्या सहकार्याने करण्यात आले. किराणा साहित्य वाटपप्रसंगी पत्रकार भगवान सोनार,विकास पाटील, आनंद गोरे , अजय चांदेलकर , उमेश देशपांडे आदी उपस्थित होते. या किराणा साहित्यात गहू , तांदूळ,तेल, डाळ , साबण , मसाले आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता .