वरणगाव : व रणगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा करून दिल्याने तसेच वरणगाव शहरात क्रांती सूर्य ज्योतीबा फुले सामाजिक सभागृह निर्माण करून दिल्याबद्दल माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आमदार राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, यांचा सत्कार सोहळा गुरुवारी सकाळी 10 वाजता भोगावती नदीजवळील शिवतीर्थ मैदानावर होत आहे. या सत्कार सोहळ्याला प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, नगरसेविका माला मेढे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, संजय जैन, शामराव धनगर, अजय पाटील, गोलू राणे, कुंदन माळी, अॅड.ए.जी.जंजाळे, संदीप भोई, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेश चौधरी, आकाश निमकर, डॉ.सादीक ज्ञानेश्वर घाटोळे, डॉ.चांदणे, कृष्णा माळी, संदीप माळी, जावेद शहा, नटराज चौधरी, पप्पू ठाकरे, शंकर पवार, भाऊलाल टिंटोरे, मनोहर सराफ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.








