जळगाव महापालिकेची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील यमुनाई हॉस्पिटल (ब्रुक ब्रॉन्ड कॉलनी) व सिग्मा हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर (महेश प्रगती चौक) यांच्यावर जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दि. ८ रोजी दंडात्मक कारवाई केली.सदर हॉस्पिटल व्यवस्थापकांनी बायो मेडिकल कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण न करता, वापरलेल्या सिरींज, नळ्या, मास्क इ. कचरा घरगुती कचऱ्यात मिसळल्याचे निदर्शनास आले. यामुळे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त उदय पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्या आदेशाने पार पडली. कार्यवाही दरम्यान आरोग्य निरीक्षक ललित बऱ्हाटे, सुरज तांबोळी, मोकदम चेतन जावळे, राहुल गायकवाड, शुभम सोनवणे यांच्या पथकाने दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी ५ हजार असा एकूण १० हजार रुपये दंड आकारला. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून महापालिकेने कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.