पारोळा ( प्रतिनिधी ) – बायो डिझेल वाहून नेत असल्याच्या संशयावरून पोलीस पथकाने दोन टँकर जप्त केले आहेत.
महामार्गावर धुळ्याकडून (एम.एच.३९-सी.३१२२) व (एम.एच.३९-सी.२८२२) या दोन टँकरमध्ये संशयास्पद पेट्रोलियम पदार्थाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती, पो नि संतोष भंडारे यांना मिळाली होती. पोलिस कर्मचारी इकबाल शेख व नाना पवार यांनी टँकरचालक जावेदखान हमीदखान पठाण व दिनेश विल्या गावित (रा.नवापूर) यांची चौकशी केली. समाधानकारक उत्तर न देता आल्यामुळे दोन्ही टँकर जप्त करण्यात आले आहेत.
यानंतर पुरवठा निरीक्षक व्ही.व्ही.गिरासे यांनी दोन्ही टँकरमधील द्रव्याचे नमुने घेऊन गुणवत्ता व निकष विभागाकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.







