पारोळा येथे घडली होती घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील बस स्थानकावरून एका महिला प्रवाशाच्या हातातील बांगड्या अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना दि. १९ डिसेंबर रोजी घडली होती. त्याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिलाबाई सूर्यवंशी (वय ६६, रा.मोराणे ता.जि धुळे) यांनी फिर्याद दिली. दि २० डिसेंबर रोजी रोकडा फार्म ता.भडगाव येथे त्यांच्या भाचीचे लग्न असल्यामुळे ते १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पती हंसराज निंबा सूर्यवंशी यांच्यासह मोराणे येथून बसने पारोळा येथे आले. यावेळी ते भडगाव बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील पाच तोळे सोन्याचा बांगड्या त्यांची किंमत सुमारे २ लाख २० हजार रुपये आहेत. त्या चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत आज २४ रोजी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करीत आहेत.