चोपडा बसस्थानकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : बस स्थानकामध्ये चोर्यांचे प्रमाण सुरूच आहे. चोपडा येथील बस स्थानकामध्ये देखील एक महिला बसमध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील सोनपोत अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना पोलीस चोपडा शहर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
बसमध्ये चढत असताना इंदुबाई दिलीप पाटील (६७, रा. चोपडा) यांची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २० जुलै रोजी चोपडा बसस्थानकावर घडली. याप्रकरणी महिलेने चोपडा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.