यावल तालुक्यातील विरावलीदरम्यान घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील विरावली ते यावल दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना एका शिक्षिकेच्या गळ्यातील ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळपोत भामट्याने चोरून नेल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या संदर्भात सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश्वरी नारायण धनगर (वय-४५, रा. वड्री ता. यावल) या एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान यावल तालुक्यातील वीरावली ते यावल दरम्यान त्या बसमध्ये प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६४ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहेत.