अमळनेर बस स्थानक येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकावर बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्यानी चोरून नेल्याची घटना दि. २५ रोजी सकाळी १०.४० वाजता घडली. अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पनाबाई पाटील (रा. कुरुकवाडे ता शिंदखेडा) ही महिला आपल्या सुनेसह सडावण येथे जाण्यासाठी अमळनेर बसस्थानकावर आल्या होत्या. पारोळा बसमध्ये चढत असताना गर्दीमुळे वाहकाने त्यांना खाली उतरवले. खाली उतरल्यावर महिलेच्या सुनेच्या लक्षात आले की सासूच्या गळ्यातील चेन गायब झाली. बसस्थानक परिसरात शोध घेतला असता काही एक आढळून आले नाही म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.