जळगाव (प्रतिनिधी ) ;- शिरसोली बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024. पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते तर प्रमुख अतिथी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बालकांचे मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले . विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापकांनी अध्यक्षीय भाषण सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक घनश्याम काळे यांनी केले. तर सूत्रसंचालन देवका पाटील यांनी केले आभार नेत्रा वाणी यांनी मानले.