शिरसोली (प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज, २६ नोव्हेंबर रोजी, ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, परीक्षा विभाग प्रमुख दीपक कुलकर्णी, आणि सांस्कृतिक समिती प्रमुख चंद्रकांत कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांसह चंद्रकांत कुमावत यांनी संविधानाची उद्देशिका वाचन करून केली.
संविधान दिनानिमित्त शाळेच्या परिसरात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच, संविधानाचे महत्त्व दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व कृतीतून समजावे, यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोस्टर तयार करणे, रांगोळी काढणे, आणि संविधानावर आधारित गीत गायन करणे यांसारख्या स्पर्धांचा समावेश होता. विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा अस्वार यांनी केले. तर, संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मनीषा पायघन यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.









