जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सन २०२३-२४ या वार्षिक वर्षामध्ये वर्गातून प्रथम आलेले व विविध स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार हे होते. तर प्रमुख अतिथी उपाध्यक्ष दिलीप बारी, शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, सचिव सुरेश अस्वार, सदस्य रामकृष्ण धनगर, रघुनाथ फुसे, यादव बारी.प्रविण पाटील हे उपस्थित होते. प्रथम मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी द्वीप प्रज्वलन व माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. विविध परीक्षा स्पर्धा व क्रीडा स्पर्धा मधील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. प्रमुख अतिथी सुरेश अस्वार व दिलीप बारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मनीषा बारी, रंजना बारी, आशा कोळी, देवका पाटील, मनीषा पायघन यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी आभार राधेश्याम काळे यांनी मानले.