संस्थाध्यक्षानी केले ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
याप्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश पुंडलिक अस्वार, संचालक निलेश खलसे,प्रवीण पाटील,मनोज बारी,अशोक अस्वार, रामकृष्ण धनगर, भास्कर पितांबर खलसे, शशिकांत वाणी, संजय राजाराम ताडे, अशोक गोकुळ बारी, राजेंद्र दगडू आंबटकर, पुंडलिक बाबुराव खलसे, नंदकिशोर लावणे, यादव रुपला बारी, उमाकांत बारी, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पर्यवेक्षक आर के पाटील, खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोपाल पुंडलिक बारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने चित्तथरारक मनोरे व संचलन सादर केले तसेच भाषणे व खाजगी प्राथमिक शाळेतील बालगोपालांनी विविध वेशभूषा करून कार्यक्रमात रंगत भरली.