विद्यार्थ्यांचे कलाविष्कार, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
शिरसोली (वार्ताहर):- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २०२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन ‘भरारी’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी ग्रामस्थांना पाहायला मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश खलसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे
उपाध्यक्ष पंडित जाधव,सचिव सुरेश अस्वार, शालेय समिती चेअरमन दिलीप बारी, खजिनदार कमलाकर तांदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी: मनोज बारी, संचालक प्रवीण पाटील, शशिकांत वाणी, केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत व इतर सल्लागार उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे शशिकांत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष, कष्ट आणि जिद्द या त्रिसूत्रीचा अवलंब करा. जिद्दीच्या जोरावर तुम्ही मोठे अधिकारी होऊन देशाची सेवा करू शकता,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अध्यक्षीय भाषणात निलेश खलसे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष निलेश खलसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन पार पडले. सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत, मनीषा अस्वार, कांचन धांडे, मनीषा पायघन आणि सुनील भदाणे यांनी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेत अतिशय नेटके नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.वकार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी केले.
सूत्रसंचालन पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत आणि दीपक कुलकर्णी यांनी केले. शेवटी मनीषा अस्वार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ‘भरारी’ स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले.









