उपाध्यक्षपदी विलास जोशी यांची निवड
शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन काटोले हे होते.
या सभेमध्ये संस्थेचे संचालक तसेच विद्यार्थ्यांचे पालक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रसंगी शैक्षणिक वर्षासाठी नवीन पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर तर पालकातून उपाध्यक्ष विलास जोशी यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या विकास संदर्भात साधक-बाधक चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रश्नांची उत्तर पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत कुमावत, दीपक कुलकर्णी, शिक्षिका मनीषा पायघन यांनी देऊन पालकांच्या समस्येचे निराकरण केले. तर आभार ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे यांनी मानले.