शिरसोली ( वार्ताहर ) :- येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिननिमित्त उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर होते.
तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. सुनिता आंबटकर, संस्थेचे संचालक तथा कार्यकारी अधिकारी मनोज बारी, संचालक राजेश आंबटकर, पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे, अशोक बावस्कर हे उपस्थित होते. प्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. सुनिता आंबटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख चंद्रकांत कुमावत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन धांडे यांनी केले. तर आभार मनीषा अस्वार यांनी मानले.









