शिरसोलीत विधी सेवा, पोलीस स्टेशन, ज्ञानभारती फाउंडेशनतर्फे आयोजन
शिरसोली (वार्ताहर) : बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात दि. २५ जानेवारी रोजी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव तसेच ज्ञान भारती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली यांच्या सहकार्याने विद्यालयात नवीन कायदेविषयक मार्गदर्शन तसेच विद्यार्थी विकास व्याख्यान व समुपदेशन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष अशोक बारी, संचालक निलेश खलसे , प्रमुख व्याख्याता व समुपदेशक ॲड. भारती कुमावत, व्याख्याता ॲड. ऐश्वर्या मंत्री, हवालदार प्रदीप पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पोलीस पाटील श्रीकृष्ण वराळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर मुख्याध्यापक राजेंद्र आंबेटकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले.
ॲड. ऐश्वर्या मंत्री यांनी बाल गुन्हेगारी व पॉक्सो कायदा बाबत सखोल मार्गदर्शन केलं. तर समुपदेशक सामाजिक कार्यकर्त्या ॲड. भारती कुमावत यांनी बाल अत्याचार व बाल संरक्षण हक्क कायदा याबाबत समुपदेशन केले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुन्हा व कायदा यातले बदल याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या पद्धतीने संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कुमावत यांनी केले. तर आभार घनश्याम काळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.