शिरसोली (वार्ताहर) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ७६ वा गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन अशोक बारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर प्रभात फेरी, लेझीम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर तांदळे, सदस्य व संचालक निलेश खलसे, संचालक प्रवीण पाटील, रामकृष्ण धनगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, संस्थेचे सर्व सभासद, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.