जळगाव (प्रतिनिधी) – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज स्वर्गीय शंकराव दशरथ काळे व स्वर्गीय कस्तुराबाई शंकरराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयातील प्रथम, द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिरसोली – बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज स्वर्गीय शंकराव दशरथ काळे व स्वर्गीय कस्तुराबाई शंकरराव काळे यांच्या स्मृती पित्यर्थ विद्यालयातील बालवाडी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अशोक अस्वार हे होते. तर प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव सुरेश अस्वार,शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे , मा.चेअरमन प्रवीण पाटील , सदस्य पूना बारी ,यादव बारी ,पंडितराव जाधव माजी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश बारी हे उपस्थित होते. स्वर्गीय शंकरराव बारी यांच्या ठेवीतून जे व्याज मिळते त्याच्यातून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. तसेच विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे यांच्या ठेवीतून इयत्ता दहावी मध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. प्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर ,व पर्यवेक्षिका सुरेखा दुबे यांनी मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन घनश्याम काळे ,मनीषा आस्वार ,व आशा कोळी .यांनी केले आभार देवका पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.