जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतून एचएचसी परीक्षेत प्रथम प्रिया काटोले, द्वितीय मनीषा घोडके व एसएससी परीक्षेत प्रथम विवेक चव्हाण,द्वितीय कोमल अहिराव व तृतीय विजय बोबडे व शाळेतून प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक तोताराम, उपाध्यक्ष दिलीप बारी, सचिव सुरेश अस्वार बारी, पंच मंडळ प्रतिनिधी व इतर संचालक, मुख्याध्यापक आरएस आंबटकर, पर्यवेक्षिका एस. आर. वैष्णव, खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. बारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.