जळगावातील तांबापुरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तांबापुरा परिसरात हातचलाखी करून अज्ञात महिला व पुरुषाने महिलेचे ६७ हजार रुपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनीत सुशीला आनंदा कापडे (वय ५३) ही महिला वास्तव्यास आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता तांबापुरा मच्छि मार्केट कडून शिरसोली नाक्याकडे जात असतांना रस्त्यात त्यांना एक अनोळखी महिला व पुरुषाने त्यांची वाट रोखली. या दोघांनी हातचलाखी करत सुशीला कापडे यांच्या अंगावरील सोन्याचा गोप, सोन्याचे कानातले टोंगल, सोन्याचे डोरले असे एकूण ६७ हजारांचे दागिने लांबविले. दागिने चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर सुशीला कापडे यांनी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी महिला व पुरूषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल सचिन मुंडे हे करीत आहेत.