जळगाव शहरातील विद्युत कॉलनी येथील घटना
तेजस जितेंद्र पाठक (वय ३३ रा. विद्यूत कॉलनी, जळगाव) हा तरूण कुटुंबियांसह राहतो. दि. ५ एप्रिल ते २६ जून २०२५ या कालावधीत त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून अज्ञात व्यक्तीने परस्पर पध्दतीने एकुण १ लाख ५८ हजार ६६० रूपये काढून घेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने अखेर बुधवारी २० ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.








