जळगाव ( प्रतिनिधी ) – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री जिल्ह्यातही अवैधच असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने 29 ऑक्टोबर, 2021 रोजी बंदी घातलेल्या फटाक्याचे उत्पादन, विक्री किंवा वापर तसेच विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनिय असल्याचे निर्देश दिलेले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार बंदी घातलेल्या फटाक्याचे उत्पादन, विक्री किंवा वापर तसेच विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा त्यांची विक्री करत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.