• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंधार्‍यात बुडून बहिण – भावाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

पहूर (प्रतिनिधी) – आई – वडील बाहेरगावी वर्षश्राद्धाला गेले असताना घरापासून जवळच असलेल्या केटीवेअर बंधार्‍या पर्यंत खेळत गेलेल्या चिमुकल्या चुलत बहिण – भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जांभूळ येथे घडली.

जांभूळ गावापासून जवळच नितीन जोशी आणि गोरख जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात. गंगापुरी येथील मूळचे रहिवासी असलेले हे भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून चरितार्थ चालवितात. रविवारी शेंगोळा (ता .जामनेर ) येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी पत्नीसह गेले असताना त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत दुपारी घरापासून जवळच सुभाष शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले.

खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हते. सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेचच मुलांच्या आई – वडिलांशी संपर्क केला. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई – वडिलांनी एकच हंबरडा फोडला. पहूरचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हे. कॉ. भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्दैवी आई-वडिलांचे सांत्वन केले.

सायंकाळी दोघा बहिण भावावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जांभूळ गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनाही अश्रू अनावर झाले.

चिमुकला ६ वर्षीय रुद्र दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. तो जांभूळ येथील अंगणवाडीत शिकत होता , पायल जांभोळ येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा बंद असल्या तरी शिक्षकांच्या गृह भेटीतून दोघे बहिण – भाऊ अभ्यास करत होते. गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, भानुदास तायडे , मुख्याध्यापक नाना धनगर आणि शिक्षक राजेंद्र भोई ,वर्गशिक्षक भास्कर इंगळे यांनी निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पायलच्या पश्च्यात तीन बहिणी आई – वडील असा परिवार आहेत.


 

 

Previous Post

एकाच दिवशी दोन तरुणांच्या आत्महत्या

Next Post

पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान दोघे बुडाले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पुण्यात गणेश विसर्जनादरम्यान दोघे बुडाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!
1xbet russia

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाहनाच्या नंबर प्लेटची अफरातफर !
1xbet russia

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा

February 18, 2026
 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जाच्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

February 18, 2026
पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

पोलिसांनी २७०० किमी पाठलाग करून डिझेल चोरांच्या मुसक्या आवळल्या!

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon