जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरात जवानाचे बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिन्यांसह मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकदेव मानमोडे, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड जळगाव हे आर्मीत नोकरीला आहे. ते पत्नी अरूणा मानमोडे यांच्यासह दिल्ली येथे सध्या राहत आहे. त्यांचे ज्ञानदेव नगरात घर असल्याने खालचे राहते, घराला कुलूप लावले होते, तर वरचे घर भाड्याने दिलेले आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ५ डिसेंबर दुपारी ३ वाजेच्या दरम्यान मानमोडे यांचे घर बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर पाहून घराच्या दरवाजाचे कडी व कोयंडा तोडून घरातील कपाटातून ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानातील जोडवे आणि १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे नाणे असा एकुा ४५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आल्याने अरूणा मानमोडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार अरूणा मानमोडे यांनी त्यांचे वडील गोपाल नारायण दुबे, रा. नेपानगर, बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) यांनी ज्ञानदेव नगरात असलेल्या घरी जावून चौकशी करण्याचे सांगितले. त्यानुसार गोपाल दुबे हे घरात येवून पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले. शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. गोपाल दुबे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.