अमळनेर तालुक्यात घडली होती घटना, मारवड पोलीसांची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील अमळगाव येथे तरूणाचे बंद घर फोडून घरातून १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे रोख रक्कमसह सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आले आहे. चोरी करणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पृथ्वीराज मोरे (वय २७ रा. अमळगाव ता. अमळनेर) हा तरूण रविवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत त्यांचे घर बंद असतांना गावात राहणारा करण उर्फ पवन कैलास मोरे याने बंद घर फोडून घरातून १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता मारवड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी करण उर्फ पवन कैलास मोरे (रा.अमळगाव ता.अमळनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.