भुसावळ शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे बंद घर फोडून घरातून दोन मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ६६ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी २६ जून रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात निशाकुमारी मनजितकुमार (वय ३१) या गेल्या काही दिवसापासून त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून दोन मोबाईल, सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ६६ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार गुरूवारी २६ जून रोजी दुपारी २ वाजता समोर आला. यानंतर महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख हे करीत आहे.