जळगावातील पिंप्राळा भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पिंप्राळा परिसरातील एका महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि एलईडी टिव्ही असा एकुण २१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा येथील स्मशानभूमी परिसरात मंगलाबाई संजय गोपाळ (वय ४०) ह्या महिला दि. २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या खिडकी तोडून आत प्रवेश करत घरातून एलईडी टिव्ही, सोन्याचे दागिने असा एकुण २१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान, दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मंगलाबाई गोपाळ हे घरी आले तेव्हा त्यांच्या घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.