एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एमआयडीसी हद्दीतील व्ही सेक्टरमध्ये बंद असलेल्या कंपनीतून तांब्याच्या तारेचे रीळ, इलेक्ट्रिक वायरचे बंडल असा एकूण ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी याबाबत तपास करून एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
गौरी पॉलीमर्स या बंद कंपनीतून चटई बनविण्याच्या मशीनचे सुमारे २५ हजार रुपये किमतीचे नवे-जुने स्पेअर पार्ट असा एकुण ४८ हजार ६०० किमतीचे चोरी झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरी सदर गुन्हाबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकास सदर गुन्हा उघड करणे बाबत सुचना दिल्या. त्या प्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे यांनी गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे कामी पोहेकों गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे व नितीन ठाकुर अशांचे पथक तयार केले.
वरील पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व नेत्रम कार्यालय येथील कॅमेरे चेक केले असता दोन अज्ञात महिला ह्या व्ही सेक्टर मधील बंद पडलेल्या कंपनीत वरील वर्णनाचा सामान गोणीत भरुन चोरी करतांना दिसुन आल्या. तसेच घटनास्थळावरील आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केले असता, सदरच्या महिला ह्या चोरी केलेला सामानाच्या गोण्या त्यांच्या साथीदारानी आणलेल्या रिक्षात भरुन घेऊन जातांना दिसुन आले. त्यानुसार सदरची रिक्षाचा नंबर निष्पण करुन व सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा अज्ञात इसम याचे नाव निष्पन्न करुन त्यास चोरी गेलेल्या मालासह व माल वाहून नेणे कामी वापरण्यात आलेल्या मालवाहू रिक्षासह ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या रा. शाहु नगर, जळगांव असे आहे. त्याचेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे सुचनाप्रमाणे पोउनि राहुल तायडे, पोहेकों गणेश शिरसाळे, पोहेकों रामकृष्ण पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे व नितीन ठाकुर यांनी केली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणणे कामी नेत्रमचे पोलीस अंमलदार पोकों पंकज खडसे व पोकों मुबारक देशमुख यांनी सहकार्य केले आहे. पुढील तपास हा पोहेकों रामकृष्ण पाटील व पोकों नरेंद्र मोरे हे करीत आहे.