जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील शेती क्षेत्राची ओळख ही केळी व भरीताची वांगी याने प्रसिद्ध आहे. सदरील पिकाचा इतिहास एकत्रित करून शासनाकडून “जळगाव केळी” व “जळगाव भरीत वांगी” या पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून *महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, नाबार्ड इ. संस्थांची बैठक लावून दि.20 सप्टेंबर 2022 पर्यंत वरील दोघं भौगोलिक मानांकन प्राप्त पिकांचा भारतीय पोस्टाद्वारे विशेष आवरण निर्गमित होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव केंद्रिय दूरसंचार मंत्रालयाकडे सादर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. अशी सूचना वजा आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषि विभागाला पत्राद्वारे दिले आहेत.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याबाबत पत्र प्रसिद्ध केले असून त्यात नमूद केले आहे की जळगाव जिल्ह्यातील शेती क्षेत्राची ओळख ही केळी व भरीताची वांगी याने प्रसिद्ध आहे. सदरील पिकाचा इतिहास एकत्रित करून शासनाकडून “जळगाव केळी” व “जळगाव भरीत वांगी” या पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, नाबार्ड इ. संस्थांची बैठक लावून दि.20 सप्टेंबर 2022 पर्यंत वरील दोघं भौगोलिक मानांकन प्राप्त पिकांचा भारतीय पोस्टाद्वारे विशेष आवरण निर्गमित होण्याच्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव केंद्रिय दूरसंचार मंत्रालयाकडे सादर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.याबाबत
सदरील प्रस्ताव सादर करावा जेणेकरून केंद्रिय पातळीवर पाठपुरावा करणे शक्य होईल व जळगाव जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशभरात होण्याच्या दृष्टीने चालना मिळेल. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे. याबाबतच्या प्रत माहिती व पुढील कार्यवाही साठी मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांना देण्यात आली आहे.